Saturday 2 December 2017

भास



तू खरी की फ़क्त तुझे भास

माझे मलाच कळत नाही

हे सत्य की फ़क्त आभास ,

तू मृगजळ की मायाजाल ?

मनाच्या खोल गाभा-यात

एक धूसर चित्र

खरेच तूच की फ़क्त तुझे भास ?

तुझ्याच आठवनिंची पंगत ,

आन् माझी एकाकी संगत,

धूसर तुझे भास ,

आन् माझे एकाकी श्वास ,

दुरून कुठुनतरी ,

येतोय तुझे आवाज़ ,

पण मला खरेच कळत नाही

हे सत्य की फ़क्त तुझे भास ?


Friday 18 March 2016

Marathi Kavita / Charoli

दुरावा आपल्याला आणखी  जवळ घेवून जातो.

Sunday 4 January 2015

! सर्वांनी आधी माहिती व नियमावली वाचावी !
हा ग्रुप तमाम मराठी भाषिकांसाठी आहे.( जो जाणतो मराठी … जो बोलतो मराठी .… )
१) आपल्या उद्योगाची माहिती फोटो/ website / पत्ता / फोन नंबर सहित व्यवस्थित द्यावी.
२) जाहिरात पोस्ट करावी शेअर नाही. 
३) कुठलेही फेसबुक पेज /समूह / ब्लॉग लिंक देऊ नये.
४) रोज जाहिरातींचा रतीब घालू नये इथे चर्चा /मदत / मार्गदर्शन हाही हेतू समूह निर्मितीमागे आहे.
५) चर्चा/ मार्गदर्शन / माहिती / आणि रोजगार निर्मिती संबंधीत लिखाण करणाऱ्यांचे स्वागत.
६) ब्रांड गुरु / workshop / पुस्तक विक्रेते / घर बसून पैसा कमवा / कर्ज (easy loan ) असली कुठलीही पोस्ट इथे स्वीकारली जाणार नाही.
७) इथे जात /पंथ /धर्म /संप्रदाय / देवदेवता तत्सम पोस्ट स्वीकारल्या जाणार नाही.
८ ) तुम्ही वरील नियमात राहुन तुमच्या उद्योगात होणाऱ्या घडामोडी/ माहिती / नवीन निर्मिती ह्यांची पोस्ट प्रकाशित करू शकता.
९ ) समूह नियंत्रकाला तुमची पोस्ट नाकारण्याचा सर्वाधिकार आहे . कुणीही वाद घालू नये.
१० ) तुम्ही नियंत्राकाशी केव्हाही चर्चा करून तुमच्या कल्पना / पोस्ट / उद्योग ह्याबद्दल चर्चा करू शकता.
समूह नियंत्रक
आपलाच मित्र
बाजी दराडे (मो. ०९२२५६२०३६६ )
(संगणक तज्ञ )
उद्योजक - software & website development ( माहिती तंत्रज्ञान सर्व सेवा )
www.gatitaa.com