Friday, 28 November 2008

ती पाऊसवेडी

ती पाऊसवेडी ,


जिथे पाऊस तिथे तीचे मन , त्याला (पाऊसाला) शोधणारी .... कायम त्याच्या विचारत असणारी आणि त्याच्या साठीच झुरनारी कधी तो येईल आणि ती त्याच्या बरोबर मुक्त मुक्त बागडेल असाच विचार करन तिला अवडायचा त्याचा स्वच्छंदी स्वाभाव आणि त्याचे बदलणारे भाव आज पर्यंत ती अनेकदा त्याला भेटली पण आज ती त्याच्या मिठीत जायला आतुर होती आज तिला फ़क्त तो हवा होता , त्याचा सहवास हवा होता आणि कदाचित त्याला पण ती ....


जणू त्याचे निरोप येत होते कालेकुट्ट ढग आकाशात घिरट्या घालत होते वारा सैरावैरा धावत होता झाडेt मधुनच aगिरकी घेउन परत उठत होते आणि घराबाहेर असलेल्या दाट वनराई मधून तिला हाका मारत होती आजपर्यंत तिने खुप पाउस पाहिले पण ती त्याच्या प्रेमात पडली होती तिचे नवतारुण्य बहरात होते आणि पवासाबद्दलचे विचारही तिला कोणीतरी बेभान हवा होता स्वताच्या मस्तीत जगणारा हवा होता हवे होते मदमस्त स्वरुप आणि नखरेल स्वाभाव आणि कधी ही सोडून जाणारा फ़क्त तिचा होउन जगणारा एक क्षण किवा त्याचा हजारवा भाग जरी सहवास लाभला तरी तो फ़क्त तिचा असावा ही एकमेव अट कोण मिळेल असे शोधत होती अचानक तिला सुचले असा फ़क्त पाऊस

No comments: